प्रतिनिधी यवतमाळ देशाच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच महिलांचे सशक्तीकरण करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये व राज्यामध्ये देश...
प्रतिनिधी यवतमाळ
देशाच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच महिलांचे सशक्तीकरण करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये व राज्यामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेन्द्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात "मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान" राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने उमेद अंतर्गत बचत गटांना फिरता निधी देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार भावनाताई गवळी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयं सहाय्यता गटांना सद्य:स्थितीत अधिकतम 15 हजार फिरता निधी (RF) वितरीत करण्यात येतो. यामध्ये राज्य सरकारने वाढ केली असून आता ही रक्कम वाढवून 30 हजार करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्वये स्वयं सहाय्यता गटांची वर्गवारी करुन "अ" वर्गवारी प्राप्त होणा-या स्वयं सहाय्यता गटांना 30 हजार देण्यात येणार आहे. तसेच वर्गवारी "ब" व "क" मध्ये येणा-या स्वयं सहाय्यता गटांना प्रचलित पध्दतीने फिरता निधी देण्यात येणार आहे. वरीलप्रमाणे अतिरिक्त फिरता निधी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व बचत गटांनी उमेदच्या कार्यालयात जाऊन आपली बॅंक खाती तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन भावनाताई गवळी यांनी केले आहे. वर्गवारीनुसार अभियानामार्फ़त ज्या गटांना 15 हजार फिरता निधी देण्यात आला आहे त्यांना पुन्हा अतिरिक्त 15 हजार निधी देण्यात येणार आहे. याशिवाय नवीन बचत गटांना किंवा ज्यांना आधी निधी मिळाला नाही अशा बचत गटांना 30 हजार फिरता निधी देण्यात येणार आहे. महिलांचे सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने राज्यातील महायुतीच्या सरकारने हा निर्णय घेतला असून सर्व बचत गटांनी लाभ घेण्याचे आवाहन तसेच काही अडचणी आल्यास जनसंपर्क कार्यालयात व स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन भावनाताई गवळी यांनी केले आहे.
भावनाताईंची स्वतंत्र यंत्रना कार्यरत
ही योजना यशस्वी करण्यासाठी शासनाची यंत्रना कार्यरत आहे. याशिवाय खासदार भावनाताई गवळी यांच्यामार्फत सुध्दा संपुर्णँ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात युवक तसेच युवतींची नियुक्ती करण्यात आली असून ते गावागावात जाऊन बचत गटांसोबत संपर्क साधून नोंदणी करुन घेत आहे. शासनाची योजना प्रत्तेक बचत गटापर्यन्त पोहोचावी. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळावा याकरीता उमेदच्या कार्यालयात अथवा नियुक्त केलेल्या समन्वयकांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन भावनाताई गवळी यांनी केले आहे.
प्रति,
संपादक / जिल्हा प्रतिनिधी
महोदय,
वरील बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रकाशित करावी, ही विनंती.
No comments