Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती यवतमाळ "जिल्हाध्यक्षपदी "अविनाश बनसोड यांची निवड

यवतमाळ कलावंतांच्या न्याय हक्कासाठी   सोमनाथजी गायकवाड (सुप्रसिद्ध गायक) संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांचे नेतृत्वा मधे राष्ट्रीय...


यवतमाळ
कलावंतांच्या न्याय हक्कासाठी   सोमनाथजी गायकवाड (सुप्रसिद्ध गायक) संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांचे नेतृत्वा मधे राष्ट्रीय स्तरावर कलावंतांची संघटना भक्कमपणे उभी करण्यात आली असून, कलावंतांच्या सामाजिक,सांस्कृतिक व आर्थिक समस्यांना शासन दरबारी  मांडण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यासाठीच या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन उभारले आहे. राज्यस्तरावर आणि प्रत्येक जिल्हा , तालुका स्तरावर कलावंतांचे संघटन करण्याच्या प्रक्रियेला प्रचंड वेग आला आहे. हजारो उपेक्षित, वंचित कलाकारांनी या संघटनेच्या आंदोलनास भरघोस पाठींबा दिला आहे."गाव तिथे शाखा" या धर्तीवर संघटनेच्या संकल्पनेला  लोक रंगभुमीवर समर्थपणे कार्य करणाऱ्या कलाकारांचे, लोककलावंताचे समर्थन मिळतं आहे. अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती चे राष्ट्रीय महासचिव  ॲड.शाम खंडारे यांचे मार्गदर्शनाखाली व.मनोहर शहारे विदर्भ प्रमूख तथा  सिध्दार्थ भवरे विदर्भ विभागीय कार्याध्यक्ष ह्यांच्याऊपस्थितीमधे दि.19 जानेवारी रोजी भावे मंगल कार्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या कलावंत मेळाव्यात यवतमाळ येथील जेष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक, नाट्य कलावंत अविनाश देवराव बनसोड ( अविश वत्सल) यांची यवतमाळ "जिल्हाध्यक्षपदी "निवड जाहीर करण्यात आली असून, ४० वर्षापासून कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची समितीने दखल घेतली आहे.
 कलाक्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा संघटनेच्या कार्याला निश्चितच फायदा होईल. असा सार्थ विश्वास त्यांनी  या प्रसंगी व्यक्त केला. अविनाश बनसोड यांचे मार्गदर्शनाखाली संघटना भक्कमपणे उभी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अविनाश बनसोड यांचे  जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील कलावंतांमधे प्रचंड उत्साह संचारला असून कलावैभव नाट्य व सांस्कृतिक संस्था यवतमाळ, पंचमवेद नाट्य संस्था, कलाश्रय नेर, संबोधी क्रिएशन नेर, सहयोग फाउंडेशन नेर, दादासाहेब फाळके चित्रपट संघटना, (यवतमाळ जिल्हा.) कला रसिक यवतमाळ. अंधश्रद्धा निर्मूलन संघटना यवतमाळ जिल्हा.      प्रेस संपादक व पत्रकार संघटना यवतमाळ जिल्हा, व्हाईस ऑफ इंडिया  यवतमाळ जिल्हा, साहित्य व सांस्कृतिक कला अकादमी पुणे, यवतमाळ जिल्हा.आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यवतमाळ. आदी कलाक्षेत्रातील आणि सामाजिक, सांस्कृतिक व साहीत्यीक क्षेत्रातील संघटनांनी अभिनंदन केलेले आहे.

No comments