कंत्राटदारांनी फटाके फोडून तसेच पेढे वाटून केला जल्लोष प्रतिनिधी यवतमाळ त्यांची बदली झाल्याचे माहित होताच सामाजिक कार्यकर्ते, कं...
कंत्राटदारांनी फटाके फोडून तसेच पेढे वाटून केला जल्लोष
प्रतिनिधी यवतमाळ
त्यांची बदली झाल्याचे माहित होताच सामाजिक कार्यकर्ते, कंत्राटदार यांनी फटाके फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष केला. दादाराव यांची बदली झाली असली तरी त्यांचेवरील निलंबनाची कारवाई प्रलंबित आहे. त्यांचेविरुध्द न्यायालयात सुरु असलेली आपली लढाई सुध्दा सुरुच ठेवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ओम तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.
यवतमाळ नगर परीषद घनकचरा निविदा प्रक्रियेमधील गैरप्रकार महाराष्ट्रातील तब्बल 17 आमदांरानी तारांकीत प्रश्न उपस्थित करुन चव्हाटयावर आनला होता. या प्रश्नाला सरकारतर्फे हिवाळी अधिवेशनात उत्तर देतांना नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी आयुक्तांनी केलेल्या चौकशीच्या आधारावर कारवाई करणार असल्याचे सांगीतले होते. या पाठोपाठ विधानपरीषदेत सुध्दा हा घोटाळा गाजल्यानंतर सभापती निलम गो-हे यांनी सदर प्रकरण डाऊन टू अर्थ असल्याचे सांगत विभागीय आयुक्तांनी कारवाईची सुचना केली असल्यामुळे अधिवेशन संपण्यापुर्वीच कारवाईची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र राजकीय दबावातून कारवाई झाली नाही. राजकीय वरदहस्ताने काही मोजक्याच मोठया कंत्राटदारांना हाताशी धरुन तसेच नियमबाहय अटी लाऊन लहान कंत्राटदारांना स्पर्धेतून बाद करण्यात आले. या प्रकरणात छोटे कंत्राटदार स्पर्धेतून बाद झाल्याने त्यांचेवर अन्याय झाला होता. विशेष म्हणजे कारंजा येथे कार्यरत असतांना मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी केलेल्या प्रारुप विकास आराखड्यामधील भ्रष्टाचार, मंजूर ले-आऊट मधील अॅमिनिटीचे नियम प्रायोजन बदलणे, बेहिशोबी संपत्ती, शासनाची परवानगी न घेता केलेले विदेश दौरे इत्यादी अनियमितता प्रकरणी तक्रारी झालेल्या आहे. यवतमाळातील कचरा संकलनाच्या कंत्राटात नगर परीषदेने निविदे संदर्भात असलेल्या नियमांचे पालन न करता स्वताच्या मर्जीनुसार अटी व शर्थी लाऊन निविदा काढल्या. या अन्यायाच्या विरोधात ओम तिवारी हे न्यायालयात गेले आहे. मालमत्ता कर अव्वाच्या सव्वा वाढविल्यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त करीत आंदोलन केले तसेच न्यायालयात धाव घेतली होती. एकंदरीत दादाराव डोल्हारकर यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता आणि आता त्यांची बदली झाल्याने कॉग्रेसचे शहर अध्यक्ष चंदु चौधरी, ओम तिवारी, लोकेश इंगोले, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तारीक लोखंडवाला, सामाजिक कार्यकर्ते भाई अमन, भिमसेना चे विनोद शेंडे, नगर परीषदचे सफाई कर्मचारी तसेच नागरीकांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे. कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब मांगुळकर यांनीही डोल्हारकर यांच्या बदलीमुळे समाधान व्यक्त केले.
कार्यवाही प्रलंबित असल्याची माहिती
मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांचेवरील कारवाई प्रलंबित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. निवडणूकीपुर्वी कार्यकाळ पुर्ण झालेल्या किंवा वादग्रस्त ठरलेल्या अधिका-यांच्या बदल्या केल्या जातात. त्या अनुषंगाने डोल्हारकर यांची बदली अमरावती जिल्हातील अंजनगाव सुर्जी येथे करण्यात आली आहे. त्यांचे वरील कारवाई प्रलंबित असून न झाल्यास शासन स्तरावर न्यायासाठी लढणार असल्याचे ओम तिवारी यांनी सांगीतले.
प्रति, जिल्हा प्रतिनिधी
महोदय, वरील बातमी आपल्या प्रसिध्द वर्तमानपत्रात प्रकाशित करावी, ही विनंती
ओमप्रकाश तिवारी, यवतमाळ 9730180277
No comments