पब्लिक पोस्ट यवतमाळ प्रतिनिधी लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असता वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याची रणनीती असल्याने यवतमाळ वा...
पब्लिक पोस्ट
यवतमाळ प्रतिनिधी
लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असता वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र लढण्याची रणनीती असल्याने यवतमाळ वाशिम मतदार संघामध्ये पेच निर्माण होण्याचे संकेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी वंचित स्वतंत्र लढणार यामध्ये तेली, माळी,धनगर, बंजारा, आदिवासी, मराठा,बौद्ध, मुस्लिम यांनी वर्षानुवर्ष केवळ मतदानच करीत राहायचे का? "ओठ हमारा राज तुम्हारा"
"नही चलेगा नहीं चलेगा" ही भूमिका घेतल्याने जिल्ह्यामध्ये राजकीय समीकरणे बदलण्याचा डाव आता सुरू झालेला आहे. बहुजनाच्या मतावरच सत्तेचं समीकरण आहे.
देशातील राजकीय परिस्थिती अत्यंत विदारक होत चालली आहे. अशातच मत विभागणीच्या सूत्रांमध्ये बसून सत्ताधारी व विरोधी बाकावर असणाऱ्या लोकांनी सत्तेच्या सारीपाठांमध्ये आपण सहभागी व्हावे याकरिता तारेवरच्या कसरती करणे सुरू झाल्या आहे असे असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2019 च्या निवडणुकीमध्ये तोला मोलाची भूमिका वटऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारांचा दारुण पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका वटवली होती. त्यावेळपासून वंचित बहुजन आघाडीच्या मतांकडे संपूर्ण महाराष्ट्रातील दिग्गजांची लक्ष लागले होते आज मात्र तीच परिस्थिती कायम असताना महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युती होईल असे संकेत काही दिवसापूर्वी प्राप्त झाली असतानाच आज मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये युती होण्याचे संकेत दिसून येत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी जर स्वतंत्र लढली तर सत्ताधारी पक्षाला व आघाडीला सुद्धा चांगलाच फटका बसण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांमध्ये बहुल असणाऱ्या बहुजन समाजातील मतांची टक्केवारी ही निर्णायक ठरणार आहे. भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार व दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचा संजय देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे येणारी लढत ही देशमुख कुणबी मराठा उमेदवारांमध्येच होणार असून इतर असणाऱ्या लोकांच्या मतदानाची टक्केवारीवर लक्ष वंचित बहुजन आघाडीने वेधले आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये मुस्लिम समाजाचे असणारे साडेतीन लाख मतदान सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आणि निर्णायक ठरणार आहे. एकीकडे भाजप ने राम मंदिराचा मुद्दा घेऊन व भगवा फडकून देशांमध्ये धार्मिक वातावरण निर्माण केले आहे तर दुसरीकडे शिवसेनेचा भगवाच प्रचारामध्ये कायम असताना या दोघांचाही विचार करता मुस्लिम समाजाच्या मतदानाचा आता गांभीर्याने विचार करायला पाहिजे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम, बौद्ध, माळी, तेली, धनगर,आदिवासी लोकांकडे आपला मोर्चा वळवला असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये तगडा उमेदवार देण्याची संकेत प्राप्त होत आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये असा उमेदवार देण्याची तयारी ही वंचित बहुजन आघाडीने चालवली आहे.
बॉक्स
वंचित चा उमेदवार बंजाराचं असणार
यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2019 मध्ये प्रवीण पवार यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली होती यावेळी त्यांनी जवळपास 95 हजार मतदान घेऊन निर्णायक भूमिका पार पाडली. यवतमाळ वाशिम मतदार संघामध्ये बंजारा समाजाचे बहुमत असून हे मत निर्णायक ठरणार आहे. ज्या मतदारांनी अत्यंत निर्णायक मतदाराची भूमिका वटवली तोच उमेदवार विजयाची पताका फडकवू शकतो. यावेळी बौद्ध मुस्लिम आणि बंजारा या तिन्ही समाजाची मते 2024 च्या निवडणुकीमध्ये निर्णय ठरणार आहे त्यामुळे किंगमेकर च्या भूमिकेमध्ये असणाऱ्या बंजारा समाजाला वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी देण्याचे जवळपास फायनल झाले असून महाविकास आघाडी समोर पेच निर्माण झाला आहे.
बॉक्स
"वोट हमारा राज तुम्हारा"
"नही चलेगा नही चलेगा"
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निलेज वाघमारे यांनी दैनिक पब्लिक पोस्ट प्रतिक्रिया देताना स्पष्ट सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून बहुजणांच्या मतदानाच्या भरोशावर सत्ताधारी सत्ता गाजवत आहे. त्यामुळे यावेळी वोट हमारा राज तुम्हारा नही चलेगा हा नारा देऊन यवतमाळ जिल्ह्याचे राजकीय वातावरण पेटलेले आहे विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभा पार पडली . त्यामध्ये मजबूत संघटन उभे केले आहे.
गाव तिथे शाखा निर्माण केल्या, अनेक सामाजिक उभारले गेले, येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या या संघटनात्मक दृष्टिकोनातून 2024 च्या निवडणुकीवर प्रचंड परिणाम होणार असून ही मतदान टक्केवारी सुद्धा निश्चितच येणाऱ्या लोकसभा उमेदवाराचे भविष्य घडविणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन समाजातील प्रत्येक समाज घटकाला न्याय मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments