*पीसीएलची परंपरा कायम,पियुषने पीसीएलच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला* बाभूळगाव(प्रतिनिधि) तालुक्यामधील पीसीएल हायस्कूल दाभा येथील...
*पीसीएलची परंपरा कायम,पियुषने पीसीएलच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला*
बाभूळगाव(प्रतिनिधि)
तालुक्यामधील पीसीएल हायस्कूल दाभा येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये पियुष पांडुरंग मेश्राम याने 98% गुण घेऊन तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. विशेषत: त्याला दोन विषयांमध्ये शंभर पैकी 100 गुण असे प्राविण्य आहे. या विद्यार्थ्याने अत्यंत परिश्रमाने हे गुण मिळविले असून या गुण मिळवलेल्याबद्दल शिक्षण विकास मंडळ दाभा येथील सचिव प्रा.वसंत परोपटे, अध्यक्ष डॉ.आनंद हजारे, तथा कार्यकारिणी ,मुख्याध्यापक महेंद्र प्रतापसिंह ठाकूर तसेच पर्यवेक्षक चंद्रकांत हुड व सर्व शिक्षकांना यशाचे श्रेय देतो. या अगोदरही या शालेने तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावीला आहे.येथील विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण खालील प्रमाणे
पियुष मेश्राम 98,वैष्णवी सरसडे 96,वैष्णवी बनारसे 96,अक्षदा कुबडे 94 ,अनुष्का घावडे 92,रोहिणी शेंडे 92,स्वेता गिरसपुंजे 92,ईशांत लोखंडे 91,मंथन शेंडे 91,सुहानी मुटकुरे 89,
दिव्या नैताम 89,तनुश्री गणेशकर 87,वेदिका लोखंडे 87,प्रशिक खोब्रागडे 92,राधिका कांबळे 87 आहेत.
*बॉक्स*
1951 ला ग्रामीण विभागांमध्ये पहिल्यांदा शाळेची निर्मिती करून मागासवर्गीयांसाठी वस्तीगृहाची निर्मिती करण्याचे कार्य शिक्षण विकास मंडळांनी केलं तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं याकरिता दाभा येथे वस्तीगृहाची निर्मिती करून अनेकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करण्याचे सामर्थ्य या संस्थेने केला आहे अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची उत्तुंग झेप आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून तालुक्यात प्रथम येणाऱ्या पियुष मेश्राम या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने मी कौतुक करतो आणि शाळेतील शिक्षकांचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आहे विशेषता या परिसरामध्ये शिक्षणाच्या सर्व सोयी उपलब्ध असणारी ही आमची एकमेव शाळा असून विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची सुद्धा सोय आहे तरी सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो
प्रा. वसंत परोपटे
सचिव शिक्षण विकास मंडळ दाभा
बॉक्स
तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान सातत्याने पीसीएल हायस्कूल दाभा येथील विद्यार्थ्यांनी पटकविला आहे खरंतर सर्व शिक्षक वृंदांची प्रचंड मेहनत विद्यार्थी घडविण्याची आहे विशेषता ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची स्वरूप उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य ही शाळा सातत्याने करीत आहे
प्राचार्य तथा मुख्याध्यापक
महेंद्र ठाकूर पीसीएल हायस्कूल दाभा .
No comments