मुंबई (प्रतिनिधी) पब्लिक पोस्ट ब्युरो यवतमाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अजित पवार गट तारीक लोखंडवाला यांना विधान परिषदेची उम...
मुंबई (प्रतिनिधी)
पब्लिक पोस्ट ब्युरो
यवतमाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अजित पवार गट तारीक लोखंडवाला यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी याकरिता विदर्भातील 20 संघटनांनी अजित दादा पवार यांना मागणी केली आहे.
विदर्भामध्ये अल्पसंख्यांक मतांचे प्रमाण जास्त असून बऱ्याच मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यांक मताचा परिणाम हा महाविकास आघाडीवर होणारा आहे असे असताना महायुतीमध्ये असणाऱ्या अजित दादा पवार गटाच्या यवतमाळच्या कार्याध्यक्ष यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन विदर्भामध्ये नवी समीकरणे जुळवण्याची तयारी सुरू झाली. या प्रक्रियेमध्ये लोखंडवाला यांना उमेदवारी द्यावी याकरिता विदर्भातील अनेक सामाजिक संघटनांनी अजित दादा पवार यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.
तारीक लोखंडवाला हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर यवतमाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये द्वितीय क्रमांकाची मते घेतली होती. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुद्धा दिग्रस विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी दाखल करून निवडणूक लढविली आहे. विविध सामाजिक उपक्रमामध्ये तारीक लोखंडवाला यांचे अमूल्य अशा प्रकारचे योगदान असून त्यांना विधान परिषदेची निवडणूक असल्याने उमेदवारी द्यावी अशी मागणी सामाजिक संघटना व पक्षाकडून केली जात आहे.
No comments