प्रतिनिधी यवतमाळ साईकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल अॅन्ड चेस्ट केअर युनिट तसेच महाराष्ट्र परिवहन महामंडळ, यवतमाळ आगार यांच्या संयुक्त विद्यम...
प्रतिनिधी यवतमाळ
साईकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल अॅन्ड चेस्ट केअर युनिट तसेच महाराष्ट्र परिवहन महामंडळ, यवतमाळ आगार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन दिनांक 1 जून रोजी करण्यात आले. एस टी महामंडळाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमीत्याने या शिबीराचे आयोजन एसटी वर्कशॉप मध्ये संपन्न झाले. या शिबीरात जवळपास शंभर एसटी कर्मचा-यांची आरोग्य तपासणी साईकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल अॅन्ड चेस्ट केअर युनिट च्या डॉक्टरांनी केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक रा.प. यवतमाळ, तसेच प्रमुख पाहुणे श्री. बीपीन चौधरी, डॉ. संजय मूत्येपोड (रेड्डी), डॉ. योगेश आंबीलकर, डॉ. जुही कडुकार उपस्थित होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात एसटी महामंडळाशी संबंधीत कर्मचारी आपल्या आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. अनेकदा दुर्लक्ष केल्यामुळे छोटा असणारा आजार सुध्दा मोठा होऊन जीवघेणा ठरु शकतो. त्यामुळे प्रत्तेकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला मान्यवरांनी दिला. या शिबीरात खोकला, दमा लागणे / श्वास लागणे, अस्थमा, अॅलर्जी, अॅलर्जीक सर्दी, काळा दमा (सि.ओ.पी.डी.) छाती दुखणे, छाती भरुण येणे, छातीमध्ये पाणी (फुफ्फसाच्या आवरणामध्ये पाणी) खोकल्यामध्ये रक्त पडणे, झोपेमध्ये घोरणे / झोपेत श्वास अडकणे/निद्रारोग, वारंवार सर्दी होणे/वारंवार छिंक येणे, फुफ्फसाचे इन्फेक्शन (न्युमोनिया), क्षयरोग (TB, MDR TB, HIV) निदान व उपचार करण्यात आले. या शिबीरात तज्ञ डॉक्टर डॉ. विजय मुन एम.डी. (मेडिसीन), डॉ.संजय मूत्येपोड (रेड्डी) एम.डी. (चेस्ट), डॉ. योगेश अंबिलकर एम.डी. (चेस्ट), डॉ. जुही राजेंद्र कडुकार एम.डी., यांनी उपचार केले. रुग्णांच्या डी.एन.बी. (चेस्ट), पी.एफ.टी. टेस्ट, ई.सी.जी., बि.पी. तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, शुगर तपासणी निशुल्क करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन श्री. अमोल गोंजारी विभाग नियंत्रक, रा.प. यवतमाळ, श्री. सतिश पलेरिया कामागार अधिकारी, रा.प. यवतमाळ, श्रीमती प्रमोदिनी किनाके, आगार व्यवस्थापक, रा.प. यवतमाळ आगार, श्री. बिपीन चौधरी संचालक, साईकृपा हॉस्पीटल, यवतमाळ यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता साईकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे सचिन भुरे, अनुराज गावंडे, मोहण गावंडे, अश्विन चरडे, अश्विनी विघ्ने, कांचन भगत, अविनाश मेश्राम, वैशाली झाडे, गजानन श्रीरामेजवार, विनोद ढाले, सुरज सपाटे, विशाल चौधरी यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन मनोज महाले तर आभार श्रीमती प्रमोदीनी किनाके आगार प्रमुख यांनी मानले.
प्रति, जिल्हा प्रतिनिधी
महोदय, वरील बातमी आपल्या प्रसिध्द वर्तमानपत्रात प्रकाशित करावी, ही विनंती.
सोबत फोटो
No comments