पब्लिक पोस्ट ( विजय मालखेडे ) नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार यवतमाळ-वाशिम लोकस...
पब्लिक पोस्ट
( विजय मालखेडे )
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील प्रतिनिधित्व करण्यासाठी उभ्या असलेल्या राजश्री हेमंत पाटील यांचा पराभव यवतमाळ जिल्ह्याच्या सत्ताधारी पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. असे असताना या पराभवाची मीमांसा राजकीय क्षेत्रामध्ये जेवढी केली जाते तेवढे सर्वसामान्य जनतेमध्ये तेवढीच मोठी चर्चा रंगत आहे. विशेषता राजश्रीताई पाटील यांचा पराभव करण्यासाठी विधानसभेची राजकीय समीकरणे बदलू नयेत तसेच सहकार क्षेत्रातील असणाऱ्या बलाढ्य लॉबीने व्यावसायिक दृष्टिकोनातून राजश्रीताई पाटील निवडून येऊ नये. याकरिता मोठी फिल्डिंग लागल्याचे हळूहळू आता समोर येऊ लागले आहे.
वास्तविक पाहता हेमंत पाटील यांचे राजकीय क्षेत्र नांदेड, हिंगोली हे होते.त्यांच्या कामाची एक आगळीवेगळी पद्धत असताना सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली होती. गोदावरी अर्बनच्या माध्यमातून या कुटुंबाने शेकडो लोकांना रोजगार दिल्याच्या चर्चा मतदार संघात रंगत असताना अचानकपणे लोकसभेच्या पूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून विशेषता मुख्यमंत्र्याच्या कार्य फळी कडून मतदार संघाचे सर्वे करण्यात आले. यवतमाळ या ठिकाणी शासकीय विश्रामगृह येथे वीस दिवसाचा मुक्काम ठोकलेल्या टीमने भावना गवळी निवडून येऊ शकतात का? या विषयाला घेऊन सर्वे केला त्यामुळे भावनाताई गवळी लोकांच्या भेटीगाठी घेत नाहीत किंवा खासदार संपर्कात नसते, भावनाताई च्या कार्यकाळात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात विकासात्मक कामे फार कमी झाली.अशा प्रकारच्या सर्वेचा अंदाज बांधला गेला वास्तविक पाहता सर्वे आणि वेळेवरची समीकरणे या दोन वेगवेगळ्या बाबी असतात. त्या महत्त्वाच्या सर्वे मध्ये या सर्वच्या टीमने भावना गवळी पुन्हा निवडून येणार नाही. अशा प्रकारचा शेरा दिल्यानंतर त्यावरती विश्वास ठेवून उमेदवार बदलविण्याच्या समीकरणाला शिवसेना एकनाथ शिंदे गट सक्रिय झाला. उमेदवार शोधता शोधता नाकी नऊ आल्यानंतर यामध्ये ही दुसरीकडे जाऊ नये याकरिता शर्तीचे प्रयत्न केल्या गेले. एकीकडे यवतमाळ जिल्ह्याची राजकीय मोट बांधता बांधता नांदेड व हिंगोलीमध्ये भाजपच्या स्थानिक लोकांनी हेमंत पाटलांना प्रखर विरोध केल्याने त्या ठिकाणी सुद्धा उमेदवार बदलवावा अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली तिथला सर्वे हा हेमंत पाटील निवडून येऊ शकतात परंतु काट्याची टक्कर होऊ शकते असा अंदाज बांधला गेला होता परंतु दोन्ही ठिकाणी उमेदवार बदलावेत असा कयास एकनाथ शिंदे गटाच्या राजकीय गोटातून ठरवण्यात आला परंतु यवतमाळ जिल्ह्याची उमेदवारी अचानकपणे राजश्रीताई हेमंत पाटील यांना जाहीर झाल्यानंतर भाजपच्या बऱ्याच कार्यकर्त्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात नाराजी होती कारण त्यांना ही उमेदवारी भारतीय जनता पार्टीला मिळावी अशा प्रकारचा आत मधून सूर निघताना दिसत होता कारण खासदार हरिभाऊ राठोड पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून जेव्हा निवडून गेले तेव्हा जातीय समीकरणाची मोट वेगळ्या पद्धतीने बांधल्या गेली होती. त्यामुळे राजश्रीताई हेमंत पाटील यांना पराभूत करण्यासाठी महत्त्वाची विधानसभेची काय तयारी राहू शकते याचा अंदाज पहिल्यांदा लावला गेला. जर शिवसेनेचा एकनाथ शिंदे गटाचा खासदार झाला तर भाजपचे सहा ठिकाणी असणारे आमदारांचे समीकरणे बदलू शकतात असा कयास बांधल्या गेल्यान मोठी गोची निर्माण झाली होती. विशेषता शिवसेनेचे वर्चस्व जिल्ह्यामध्ये जर वाढले तर भाजपच्या राजकारणाची वाताहात होईल असा चर्चेचा सुर समोर आल्यानंतर राजश्रीताई च्या प्रचारार्थ पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये भाजपचे नियोजन आढळून आले नाही. दुसरीकडे शिवसेनेच्या प्रचारादरम्यान फक्त विद्यमान पालकमंत्री संजय राठोड यांनी जीवाचे रान केले परंतु इतर ठिकाणी मात्र पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला नाही एकीकडे केंद्राच्या मुद्द्यांचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा उल्लेख दिसून आला. वाढती बेरोजगारी शेतकऱ्यांच्या मालाला भाव, विकासात्मक कामाचा अभाव व बदलणाऱ्या संविधानाची चर्चा आणि फोडाफोडीच्या राजकारणातील नाराजी या मुद्द्यांवरतीच ही निवडणूक लढल्या गेली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे पारडे हळूहळू जड होऊ लागले विशेषता 20 दिवसांमध्ये राजश्री हेमंत पाटील यांना निवडणुकीच्या या सर्व बांधणी करिता वेळ मिळालेला नाही.त्यामुळे त्यांना पराभवाचा झटका सहन करावा लागला. अशातच अवघ्या वीस दिवसात राजश्री ताईंनी जीवाचे रान करून पाच लाखाच्या वर मतदानाचा पल्ला गाठणे हे मोठे कमालीचे झाले. राजश्री ताईंनी वीस दिवसात सर्व सहकार्याची मने जिंकत प्रचारात आघाडी मिळवली होती अशातच
सहकार क्षेत्रामध्ये हळूहळू निर्माण झालेले वर्चस्व कमी करण्याच्या दृष्टिकोनातून यवतमाळ जिल्ह्यातील सहकार लॉबिने सुद्धा मोठा किरदार निभावल्याची चर्चा आहे. विशेषतः फक्त बोलायचे मात्र एक व्यावसायिक स्पर्धक म्हणून याकडे मोठ्या वेगळ्या पद्धतीने बोलल्या गेले. आजही यवतमाळ जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये विशेषता बँकिंग क्षेत्रामध्ये गोदावरीचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र सहकार क्षेत्रातल्या लॉबीने पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये सहकार्य केले नाही. विशेषता सहकार क्षेत्रातल्या लॉबीचा प्रभाव कोणत्याच गटाकडे आहे हे सांगण्याची गरज नाही त्यामुळे एकीकडे नवीन कार्यकर्त्यांची फळी, दुसरीकडे भाजपची नाराजी, तिसरीकडे सहकार क्षेत्राचे वेगळं पण आणि समीकरणाच्या पलीकडे असणाऱ्या विधानसभेची समीकरणे हे राजश्रीताई पाटील यांना भोवली असल्याचे दिसून येते.
काँग्रेसचे असणारे वेगवेगळे गट यावेळी एकत्रित आल्याचे दिसून आले गेल्या अनेक दिवसांपासून सत्तेच्या दूर असणाऱ्या लोकांना सत्ते शिवाय करमत नाही असं समाजामध्ये बोलले जाते त्यामुळे आता आपल्यामध्ये जर फूट राहिली तर कदाचित येणाऱ्या काळात ही सत्ता आपल्याकडे राहणार नाही म्हणून हेवे दावे विसरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितरीत्या काम करणे सुरू केले. जरी आत मधून एकमेकांचे पटत नसले तरी चेहऱ्यावर मात्र आम्ही मित्र असल्याचा भाव बऱ्याच कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये दिसून आला त्याचाही फायदा यावेळी महाविकास आघाडीला झाला युतीमधील असणारी ही समीकरणे मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये दिसून आली नाही.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कॅडरबेस कार्यकर्ता पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये सक्रिय असल्याचे जाणवलं नाही त्यांची समीकरणं कोणती होती हे सांगायला आता कोणीच तयार नाही परंतु केंद्रामध्ये मोदी असावे ही या बॅनरखालीच हा सर्व प्रकार चालला होता पण स्थानिक च्या मुद्यांकडे दुर्लक्ष केल्याने अत्यंत जाणून पराभवाच्या छायेत उमेदवाराला जावं लागलं ही बाब अत्यंत खेदाची आहे
भावना गवळींचे पुनर्वसन होणार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांची समजूत काढत असताना तुमच्या पुनर्वसनाचा आणि राजकीय स्थैर्याचा मी नक्कीच विचार करेल असा आशावाद त्यांना दिला होता असे असताना भावना गवळींना शब्द दिल्यानंतर भावना गवळींनी कुठल्याही प्रकारची हालचाल न करता विद्यमान खासदार असताना सुद्धा ही उमेदवारी सोडली परंतु भावना गवळींना यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे राजकीय राजकारण पूर्ण माहीत होते असे असताना यावेळी शिवसेनेचा पराभव झाल्याने शिंदे गटाला मोठा झटका बसला तर दुसरीकडे भावना गवळीच्या पुनर्वसनाचा विचार मात्र वरच्या स्तरावरती केल्या जात आहे कदाचित जर राज्यसभेची जागा शिवसेनेला सुटली तर प्रथम क्रमांकावर भावना गवळींचा विचार केल्या जाऊ शकतो अशी चर्चा सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये आहे तर दुसरीकडे येणाऱ्या विधानसभेमध्ये विदर्भातील शिवसेनेच्या निवडणुकीच्या या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये भावना गवळीचे मत घेतले जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जरी आज भावना गवळी पराभूत झाल्या असल्या तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मताची निर्णायकता तितकीच कायम राहणार आहे हेही तेवढेच सत्य आहे
No comments