Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांनी अधिकाऱ्यांचा घेतला साडे आठ तास क्लास

अमरावती(पब्लिक पोस्ट ब्युरो) अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अने...

अमरावती(पब्लिक पोस्ट ब्युरो)
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी तथा समस्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडे आल्या होत्या त्या सोडवण्याच्या अनुषंगाने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आमदार सुधाकर राव अडबाले वि. प. सदस्य महाराष्ट्र राज्य मुंबई तथा महाराष्ट्र राज्य महामंडळाचे  अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे,  मा. शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख,  यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी विज्ञान महाविद्यालय मोर्शी रोड अमरावती येथे सभा संपन्न झाली सभेमध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील प्राथमिक , माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक वेतन पथक अधीक्षक, अमरावती विभागातील सर्व लेखाधिकारी उपस्थित होते.
 *अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात तीन वर्षापासून प्रचंड प्रमाणात थकीत वेतन देयके प्रलंबित आहेत याबाबत आमदार महोदयांनी वेतन पथक अधीक्षक व शिक्षणाधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले*  आपण वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे ही वेळ आली असल्याचे आमदार महोदयांनी याप्रसंगी सांगितले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी दिलेल्या सूची पत्रानुसार समस्यांचे वाचन करण्यात आले याप्रसंगी थकीत वेतन देयके, वैद्यकीय बिले, सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या देय रकमा, जीपीएफ, डीसीपीएस, एन. पी. एस. च्या पावत्या, पदोन्नती प्रकरणे, प्लॅन मधील शाळा नॉन प्लॅन मध्ये आनने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नतीची प्रकरणे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, अनुकंपा प्रकरणे यासह अनेक महत्वपूर्ण विषयावर सखोल चर्चा करण्यात आली व अनेक विषयाच्या संदर्भात  शिक्षण उपसंचालक मा.पटवे साहेब यांनी सभास्थळी अधिकाऱ्यांना निर्देश दिले अमरावती जिल्हा वेतन पथक व यवतमाळ जिल्हा वेतन पथक या कार्यालयात अनियमितता असणे आणि कर्मचाऱ्यांची अनेक वर्षापासून ची देयके थकीत असणे याबाबत आमदार सुधाकर  अडबाले यांनी दोन्ही कार्यालयाची चौकशी लावण्याची जोरदार मागणी उपसंचालक यांच्याकडे लावून धरली याबाबत सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा शब्द सभेमध्ये शिक्षण उपसंचालक यांनी दिला .
तक्रार निवारण सभेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी  अध्यक्ष श्रावण बरडे, विज्युक्टाचे अध्यक्ष अविनाश बोर्डे, सचिव गव्हाणकर वि.मा.शी.चे उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर, उपाध्यक्ष विजय ठोकळ विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे, अरविंदराव मंगले,अरविंद चौधरी अतुल देशमुख ,दशरथ रसे ,जयंत सराडकर ,पवन बन , रामकृष्ण जीवतोडे ,नितीन गायकवाड , शशांक मोहोळ , सतिश शेळके, रामदास गुरव , कुलदीप बदर , रामेश्र्वर वाळले, महेंद्र सालंकर , अतुल लोंढे,  एम.डी. धनरे, प्रा. खाडे ,गजेंद्र शेंडे , आनंद मेश्राम, साहेबराव धात्रक,श्याम बोडे, विठ्ठल परांडे ,उमाकांत राठोड या संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सह शेकडो समस्याग्रस्त शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

No comments