Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

सर्वोच्च न्यायालयाचे उपवर्गिकरन विरोधात अनुसूचित जाती जनजाती संघटना एकवटल्या

यवतमाळ सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक ऑगस्ट 2024 रोजी एससी एसटी यांच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं या निर्णयाच्या बाबत चर्चा करण्य...




यवतमाळ
सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक ऑगस्ट 2024 रोजी एससी एसटी यांच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं या निर्णयाच्या बाबत चर्चा करण्याकरिता दिनांक आठ  ऑगस्ट 2024 रोजी स्थानिक सेलिब्रेशन हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अभि दीपक नगराळे होते या बैठकीमध्ये समाजातील  महादेव कोडापे ,कवडू नगराळे ,रमेश जीवने , चंद्रकांत सरदार सोपान कांबळे , विचारवंतांनी सहभाग नोंदवला व आपली मते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये ॲड.जयसिंह चव्हाण यांनी एससी एसटीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात judicial review करण्याबाबत मत व्यक्त केले. न्यायालयाने दिलेला निर्णय हा केवळ निवाडा असून न्याय नाही असे सुद्धा त्यांनी म्हटले मुळात एससी एसटी चे आरक्षण हे अस्पृश्यता निर्मूलन होऊन त्यांना समाजातील मुख्य प्रवाहामध्ये सामील होता व्हाव याकरिता आरक्षणाची निर्मिती करण्यात आलेली आहे परंतु असे असताना सुद्धा या महत्त्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष करून सदरील निर्णय देण्यात आला याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होऊन सनदशीर मार्गाने या निर्णयाविरोधामध्ये काय उपाययोजना करता येईल याबाबत विचार विनिमय करण्यात यावा असे मत मांडले. या सभेस ओम प्रकाश नगराळे , रवि नगराळे , राजू चांदेकर  सिंधू ताई धावणे धनराज धावणे किरण मानकर, राजू मडावी देवानंद गवई , कैलास भगत , राजेश जुनगरे हरिदास आघम  नारायण थुल , विश्वास   विश्वास वालके अरविंद  दीवे विश्वनाथ बोबडे , संतोष राऊत  राजेश गेडाम , पुंडलिक मेश्राम उमेश मेश्राम  शिवा राऊत , शंकर नारनवरे बालकृष्ण सरकाटे देवानंद  लोनारे घनश्याम भारशंकर , पंडित दीघाडे, मिलिंद मेश्राम , आनंद भगत  सूरज पैन , सन्नी उके, रामदास वीर , राजकुमार ऊमरे, अशोक गेडाम , यशवंत अंबुळकर , आश्र्वजीत शेळके ,  रवि चव्हाण ,आणि भारत जोरवांडे उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ मानकर यानी केले

No comments