प्रतिनिधी यवतमाळ प्रत्तेक महिलेची समाजाकरीता काहीतरी करण्याची इच्छा असते मात्र काही अपरीहार्य कारणाने त्या समोर येऊ शकत नाही. त्...
प्रतिनिधी यवतमाळ
प्रत्तेक महिलेची समाजाकरीता काहीतरी करण्याची इच्छा असते मात्र काही अपरीहार्य कारणाने त्या समोर येऊ शकत नाही. त्यामुळे महिलांनी संकोच न करता समाजकारण आणि राजकारणात आपला सहभाग नोंदवावा. महिलांचे हे प्रयत्न समाजातील दिन, दलित, गरजुंना नक्कीच फायद्याचे ठरतील असे प्रतिपादन घाटंजी नगर परीषदेचे माजी उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर यांनी केले. ते रक्षा बंधन कार्यक्रमात बोलत होते.
लाडकी बहीन योजनेचा सर्व महिलांना लाभ मिळावा याकरीता शैलेश ठाकूर यांनी अथक परीश्रम घेतले. मेळावे आयोजित करुन महिलांचे अर्ज भरुन घेण्यात आले. या सर्व लाभार्थी महिलांनी मिळालेल्या लाभाची परतफेड म्हणून रक्षा बंधन कार्यक्रमाचे आयोजन केले. दिनांक 25 ऑगष्ट रोजी घाटंजी येथे आयोजित या कार्यक्रमात सर्व महिलांनी शैलेश ठाकूर यांना राखी बांधून त्यांचे आभार मानले. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध शासकीय योजनेबद्दल महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. यासमोरही महिलांना येणा-या अडचणी तसेच योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे शैलेश ठाकूर यांनी सांगीतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. साधनाताई माडूरवार तसेच श्री. विनोद महाजन यांनी कार्यक्रमाचे कौतुक करीत आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला सय्यद फिरोज, विक्की ठाकूर, पवन गोडे, शुभम उदार, सय्यद मुशीब, वसंता मोरे, विलास बोरकर, पप्पू खोब्रागडे, सुरेश जाधव, उमेश खांडरे, गजानन राऊत, मयूर बिसमोरे, सुभाष गटलेवार, श्रीकांत म्यॅनेवार, सय्यद वसीम, शंकर लेनगुरे, राजू किनेकार, सौ. सुवर्णाताई गोमासे, मिनाताई गिरनुले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घाटी येथील श्रीमती अर्चना महेन्द्र चिव्हाने, सौ. वैशाली सुभाष ठाकरे, सौ. सिंधुताई मारोती शिरपूरे, सौ. वैशाली छगन गोंडे, सौ. जया रवीराज चौरागडे, सौ. अर्चना प्रदिप मोरे, सौ. दिपाली विलास बोरकर, सौ. सिंधुताई अशोक दरणे यांनी परीश्रम घेतले. संचलन सौ. वर्षा कोमावार, कु. दिप्ती सुरेश जाधव यांनी केले. लाडकी बहीन योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळावा याकरीता प्रामुख्याने परीश्रम घेतलेले सुरेश शिवराम जाधव, सौ. सिंधुताई अशोक दरणे यांचा शाल तसेच श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार
शासन मोठया प्रमानात गरजुंकरीता योजना राबविते मात्र अनेकांना माहिती नसल्याने त्या योजनांचा लाभ घेता येत नाही. आम्ही लाडकी बहीन योजनेकरीता प्रयत्न करुन शेकडो महिलांना योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. आता यापुढेही शासकीय योजनांचा लाभ सर्व गरजुंना मिळावा याकरीता प्रयत्न करणार आहो.
शैलेश ठाकूर
माजी उपनगराध्यक्ष, घाटंजी
प्रति, संपादक, जिल्हा प्रतिनिधी
वरील बातमी आपल्या प्रसिध्द वृत्तपत्रात प्रकाशित करावी. ही विनंती.
सोबत फोटो
No comments