यवतमाळ दिनांक २४ ऑगस्टला सेंट्रल सेलिब्रेशन हॉल, यवतमाळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, महिला ...
यवतमाळ
दिनांक २४ ऑगस्टला सेंट्रल सेलिब्रेशन हॉल, यवतमाळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, महिला आघाडी,व युवा आघाडीची संयुक्त बैठक पार पडली. यवतमाळ जिल्ह्याचे निरीक्षक एडवोकेट- प्रियदर्शी तेलंग हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते
एडवोकेट प्रियदर्शी तेलंग
यांनी शहर कार्यकारिणीचा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेतला. तसेच शहरातील ओबीसी व आदिवासी संघटनेच्या प्रमुखांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. आठवडाभरात संपूर्ण शहरात बुथ बांधणीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले.
डॉ.नीरज वाघमारे यांनी सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, भूतकाळातील पद व प्रतिष्ठा या सर्वाचे अभिनिवेश बाजूला ठेवून वर्तमान स्थितीमध्ये एकजुटीने व गांभीर्याने कामाला लागावे, पदाधिकारी जोमाने कामाला लागल्यास वंचित बहुजन आघाडीला मोठे यश मिळू शकते. वंचित बहुजन आघाडीने कोणत्या दिशेने आणि गतीने वाटचाल केल्यास यश पदरात पडू शकते, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
सभेत विद्वत सभेचे सदस्य प्रा.अमित भगत व
मा.पंडीत दिघाडे यानी समयोचित विचार मांडले.
सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव शिवदास कांबळे यांनी केले.
सभेला पांडुरंग मेश्राम-जिल्हाध्यक्ष(पश्चिम)गजानन सावळे- शहराध्यक्ष,
पुष्पाताई शिरसाट- महासचिव, आकाश वाणी- युवा अध्यक्ष,,प्रमोद पाटील,शहर महासचिव,प्रसेनजित भवरे- कार्याध्यक्ष,
विलास वाघमारे-शहर उपाध्यक्ष,
डी.के. दामोदर
दीपक नगराळे, निरंजन खडसे, नामदेव इंगोले, रवी वाघमारे, घरडे साहेब, अशोक मनवर,गोवर्धन मनवर, निलेश थुल,
गजानन कोकाटे, शैलेश भानवे, रवींद्र नगराळे,
भारती सावते, प्रमिला भगत,शोभना कोटंबे, वंदना उरकुडे, सविता तिडके, सरला चचाने, संध्या काळे, राजेंद्र तलवारे, धनंजय गायकवाड, बाळासाहेब वीर, उत्तमराव कांबळे रत्नमाला कांबळे, कल्पना भगत, चंद्रकला उमरे, रत्नमाला ताकसांडे, ताईबाई ताकसांडे,
इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments